आस

Started by dhanu2741, June 10, 2020, 02:20:54 PM

Previous topic - Next topic

dhanu2741

प्रेमाची आस तुझ्या आज लागली
तो क्षण तो स्पर्श जस तुला मिठी मारली
किती वेळ दिवस झाले तू नाही दिसली
प्रेमाची आस तुझ्या आज लागली।।१।।

आत तर तुझं दिसणं पण कमी झालंय.. ते का?
पहिल्या सारखं smile देणं पण विसरलीस का
आता नाही राहवत तुझी आठवण येऊ लागली
प्रेमाची आस तुझी आज लागली ।।२।।

आता पहात बसतो सारखा एकटक त्या वाटेकडे
कधी तू येते अन पाहून हसते माझ्याकडे
ती वाटही आता रिकामी वाटू लागली
प्रेमाची आस तुझ्या आज लागली ।।३।।

किती वर्षे झाले याची काय नोंद नाही
प्रेमात तर कोणाचीच फिकीर उरली नाही
किती ती मज्जा केली सारी विसरून गेली
प्रेमाची आस तुझ्या आज लागली।।४।।

मैत्री मध्ये रमत रमत कधी प्रेम झाले कळलेच नाही
प्रेम करून पण प्रपोज मारायला काय जमलंच नाही
आता सगळं संपलं अशी भीती वाटू लागली
प्रेमाची आस तुझ्या आज लागली ।।५।।

रोजच असतो म्हणे दिवस नवीन
प्रपोजच नाही केला आता करू कस लगीन
तुझ्यासाठी रात्रीच दिवस आणि दिवसाची रात्र केली
प्रेमाची आस तुझ्या आज लागली।।६।।

- © धनराज लहाने (०१/०५/२०१५)
    आटगाव (आगरीपाडा)

Yogesh9889

Khup Sundar kavita :)

dhanu2741

धन्यवाद🙏

Yogesh Nimase

मस्त....☺️

Vrushali nimase

सुंदर...  Keep it up!!!

dhanu2741

धन्यवाद योगेश आणि वृषाली😊😊