अस्तित्व

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 12, 2020, 06:44:57 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.अस्तित्व*

कितीही धडपडलात मिळतं नाही अस्तित्व हे
मन मोकळे जगतांना कळतं नाही अस्तित्व हे

जाऊ कुठे सांगा मित्र हो आता एकटा मी
सुखात असता खळखळतं नाही अस्तित्व हे

एकट्या जिंदगीशी जरा जवळीक करतांना
कष्टाच्या भाकरीत ही मळतं नाही अस्तित्व हे

मिळाली नाही मोकळीक जिंदगी जगण्याची
कलंकित जिंदगीला टळतं नाही अस्तित्व हे

टाकतो आहे मरणाच्या वाटेवर पाय रोवून
पाऊल खुणांसारखं ढळतं नाही अस्तित्व हे

लावा आग मित्रांनो देहाला या संपवण्यास
चटके सोसतांना भळभळतं नाही अस्तित्व हे

आता नकोय मला उरलेलं ही अस्तित्व माझं
सरणावर गेलोय तरी जळतं नाही अस्तित्व हे

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर