माझी मायमराठी माती

Started by Prashant Jain, June 14, 2020, 03:28:28 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

माझी मायमराठी माती

माझी मायमराठी माती
मनामनात रुजली प्रेमाचीं नाती
सह्याद्रीचे कडे गर्जती
कृष्णा गोदा इथे वाहती

इथे नाही धर्म जात पात
प्रत्येकाच्या मनात माणुसकीच नात
गर्वगाणं गाती मायमराठीचे एकसुरात
अभिमान मायमराठीचा सर्वांच्या उराउरात

इथे झाडे वेलींवर फुलें फुलती
रानावनात पक्षी डोलती
हिरवाईने नटली सारी डोंगरमाळ
रम्य असे इथे सांजसकाळ

देहू आळंदी इथे अनेक तीर्थ
प्रेमं आणि मानवता सर्वांचा भावार्थ
संतसंप्रदायाचा असे थोर वारसा
ज्ञानेश्वरी,  तुकाराम गाथा शिकवणीचा आरसा

या मातीत जन्मलें अनेक वीर
हिंदवी स्वराज्य घडविणारें शिवबा ते थोर
समयप्रसंगी वीरांनी दिले प्राणांचे बलिदान
दिल्लीचेही तख्त राखिले याचा अभिमान

मायमराठीचे किती करावे गुणगान
शब्द ही कमी पडावे अशी गुणांची खान
हिच्यापुढे देवलोकीचा स्वर्ग ही फिका पडावा
या मातीत जन्म घेण्याचा योग सदा घडावा


कवी – प्रशांत जैन,
           शेवगांव,  अहमदनगर,
            M -9321931008.