प्रेम

Started by रवि पाटील, June 14, 2020, 11:13:51 PM

Previous topic - Next topic

रवि पाटील

॥ प्रेम ॥

ते स्वप्नांतले चंद्र तारे
मनात चमचमणारे!
शृंगार तुझ्या यौवनाचे
मग माझ्याशी बोलणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हे गार गार वारे
तुला स्पर्शुन वाहणारे!
प्रितीचे बाहु पसरून
मग! माझ्या मिठीत शिरणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हे शब्दं तुझे मधाळ बोलणारे
ऐकुणच मज घायाळ करणारे!
मनाचं दार सताड ऊघडुन
मग! ह्रुदयात जाऊन धडधडणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हे केस तुझे भुरभुरणारे
हवे सोबत लाडीक खेळणारे!
मज दिसे रूप तुझे त्यातुन
मग! ह्रुदयात येऊन छळणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हास्यकळीचे तुझे हे फवारे
हास्य सुगंधाने दरवळणारे!
मज मोहुन त्यात अलगद
मग! ऊमलुन अंगभर शहारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

र. सु. पाटील___🖌
नाशिक
मो. ९६५७००२२०९