सहजच

Started by रवि पाटील, June 18, 2020, 11:03:28 AM

Previous topic - Next topic

रवि पाटील

॥ सहजच ॥

सहजच पाण्यासोबत खेळून पहावं.
चिंब चिंब भिजल्यावर,
त्याच्याच कवेत निथळत रहावं.

सहजच वाय्रासोबत खेळून पहावं.
छाती फुगवून श्वास घेतल्यावर,
त्याच्याच कक्षेत उडत रहावं.

सहजच उन्हासोबत खेळून पहावं.
अंग अंग ऊबदार झाल्यावर,
त्याच्याच गर्मीत न्हाउन निघावं.

✍🏻____र. सु. पाटील.
मो. ९६५७००२२०९