पालखी चालते

Started by Prashant Jain, June 18, 2020, 05:24:49 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

 पालखी चालते

मनात पांडुरंग
तोंडात अभंग
भोळ्या भक्तांच्या......

पालखी चालते
शब्द बोलते
नाम विठुरायाचे.....

डोक्यावर तुळस
दिसतो कळस
पंढरीच्या मंदिराचा.....

हाथात मृदूंग टाळ
गळ्यात माळ
विठ्लाच्या लेकराच्या.....

चंद्रभागा वाहते
वाट पाहते
माऊलीच्या पालखीची.....

भक्ताचा मेळा
होता गोळा
आषाढी कार्तिकेला.....

आषाढीचा सण
पालखीचे आगमन
विठुरायाच्या पंढरीत.....

विठोबा माऊली
मायेची सावली
सुखावते भक्तांना......

विठूमाऊलीचे दर्शन
मोक्षाचा क्षण
जीवन प्रवासातला.....

-प्रशांत प्रकाश घोडके
शेवगांव, अहमदनगर.
M - 9321931008