पालखी चालते

Started by Prashant Jain, June 18, 2020, 10:38:00 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

          पालखी चालते

मनात पांडुरंग  l  तोंडात अभंग l
भोळ्या भक्तांच्या l

पालखी चालते l शब्द बोलते l
नाम विठुरायाचे l

डोक्यावर तुळस l दिसतो कळस l
पंढरीच्या मंदिराचा l

हाथात मृदूंग टाळ l गळ्यात माळ l
विठ्लाच्या लेकराच्या l

चंद्रभागा वाहते l वाट पाहते l
माऊलीच्या पालखीची l

भक्ताचा मेळा l होतो गोळा l
आषाढी कार्तिकेला l

आषाढीचा सण  l  पालखीचे आगमन l
विठुरायाच्या पंढरीत l

विठोबा माऊली l मायेची सावली l
सुखावते भक्तांना l

विठूमाऊलीचे दर्शन l मोक्षाचा क्षण l
जीवन प्रवासातला l

-प्रशांत जैन,
शेवगांव, अहमदनगर,
M - 9321931008