सखे सोबती

Started by Prashant Jain, June 21, 2020, 05:18:08 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

     सखे सोबती

जीवनाच्या प्रवासात
अनेक भेटले सखे सोबती....
सहवास आवडला मनाला
जुळली प्रेमांची नाती......

राग, लोभ, द्वेष नव्हता
कुणाच्याही मनात.....
निखळ मैत्रीचं ते नात
बहरत होत जीवनात......

चालण्या बोलण्यातून कळत गेली
एकमेकांबद्दल माहिती......
आपुलकी वाटली मनाला
कळली प्रेमाची महती......

कधी हसलो, कधी रुसलो
एकमेकांच्या सहवासात.....
संकटसमयी धाऊन गेलो
ऊन वारा पावसात.....

जीवापेक्षाही प्रिय असणारे मित्रं
कुठल्यातरी वळणांवर वळून गेलें.....
मनात तेवत वत राहिला आठवणींचा दीपक
विरहाचे दुःख त्यात जळून गेलें.....

-प्रशांत जैन
शेवगांव, अहमदनगर.
M- 9321931008
prashant851@gmail.com