माय कष्ट करती

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 22, 2020, 10:49:17 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.माय कष्ट करती*

माय कष्ट करती उन्हात स्वप्नं रंगीत करण्या
घरातल्या उपाशी पिल्लाला घास हा भरण्या

माय चालता अनवाणी काटा टोचतो पायी
असे दुःख पाहून तिचे गोठ्यात हंबरते गाई

रघात सांडता धरणीवर का होतात वाटण्या
फुले उमलून येती अन होतात ह्या छाटण्या

बाप पेरतो घाम माय आसवं पोत्यात टाचते
उभ्या पिकात पाणी होऊन तिची माया साचते

घाव होतो काळजाला नांगर धरतांना बाप
विचार करतो जेव्हा श्वासांचे होते मोजमाप

सण नावाला सारे सुख हसून चुलीवर जाते
राख हातात येते जेव्हा भाव माती मोल होते

भाव पडलेला पाहून बाप फासावर चढला
उरल्या सुरल्या सुखाला आग लावून हा गेला

✍🏻 कविराज.अमोल
मो.९६३७०४०९००.अहमदनगर