पर्यावरण

Started by Prashant Jain, June 22, 2020, 07:36:35 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain



                   पर्यावरण

माणसापेक्षा वाहने झाली जास्त,
वाढले रे प्रदूषण.....
विकासाची गंगा वाहते पण
धोक्यात आहे पर्यावरण.....

सिमेंटच्या जंगलासाठी
तोडली हिरवी जंगल.....
वृक्षतोड थांबवा लवकर,
नाहीतर होईल अमंगल.....

ओसाड पडली माळरान,
वाढल पृथ्वीच तापमान.....
वाढल कार्बन डाय ऑक्ससाइड, 
दूषित झाल हवामान.....

डोंगरदऱ्या, नदी, जंगल यांचे
करा संरक्षण आणि संवर्धन.....
सर्व जीवांची ही धरणीमाता, 
जगू द्या रे वन्यजीवन.....

सर्वांना देऊन पर्यावरण शिक्षण, 
निसर्गचक्राची ठेवा जाण.....
कमी करा वाढलेलं प्रदूषण
तरच वाचतील सर्वांचे प्रांण.....

ओळखून भविष्यात येणारे संकट
करा रे वृक्षारोपण.....
हिरवाईने सजेल धरणीमाता, 
सुखी होईल जनजीवन.....

-प्रशांत जैन
शेवगांव,  अहमदनगर
M- 9321931008