घरट्याची किंमत

Started by Shilpa Mohite, June 24, 2020, 09:04:19 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १२ वे
            घरट्याची किंमत

सारी चिमणी पाखरे घरट्याकडे परतली
घरट्याची किंमत आता त्यांना कळली

आई-बाबा बसतात वाटेकडे डोळे लावून
अपेक्षा फक्त एकच भेटावे एकदा येऊन

डोळ्यात त्यांच्या फक्त मुलांसाठी तळमळ दिसली
आई-बाबांच्या नात्याची आज ओळख पटली

आपलेपणा काय असतो आज त्यांना कळलं
कित्येक वर्षांनंतर आज घर आनंदाने भरलं

सल्ला लाख मोलाचा सदैव ठेवा लक्षात
देवघेव कधी नसते आई-बाबांच्या नात्यात

उंच भरारी घेण्यासाठी त्यांची कधीही ना नाही
फक्त लक्षात ठेवा घरामध्ये आहेत बाबा आणि आई

काही क्षण सुखाचे येऊद्या त्यांच्या जीवनात
भरभरून देतील आशीर्वाद सुखी रहाल संसारात

रहा बंगला बांधून कुठेही,गाठा यशाचे शिखर
मात्र विसरू नका कधीही गावाकडचे घर
         
                            -शिल्पा मोहिते