पाऊस

Started by उत्कर्षा, June 27, 2020, 02:52:24 PM

Previous topic - Next topic

उत्कर्षा

पाऊस येतो भेटायला त्याच्या प्रेयसीला धुंद न्हाऊन टाकायला......एकदा का धरणी आणि पावसाच मिलन होत सगळ जग कस बहरून निघत ...
पावसाच्या आधी लाही लाही होते अंगाची का ? तर, खूप वाट पाहून चिडलेली असते ती आणि मग तो तो तिला मनवायला नुसत मनवायला नाही तर लाडी गोडी लाऊन तिच्या मिठीत यायला ...पावसाच आणि धरणीच मिलन आहे काही औरच नुसत  बरसन आणि तिला चिंब चिंब न्हाऊन टाकण ....