स्वप्नसुंदरी

Started by रवि पाटील, June 27, 2020, 06:30:49 PM

Previous topic - Next topic

रवि पाटील

॥ स्वप्नसुंदरी ॥

माझ्या स्वप्नांतल्या स्वप्न सुंदरी,
माझ्यासाठी एव्हढं करशील का?
रोज स्वप्नात येउन माझ्या,
अशीच छळत राहशील का?

हळूच येउन कानात माझ्या,
मंजूळ फुंकर घालशील का?
अशीच कोमल स्पर्शांनी तुझ्या,
रोज साखरझोप मोडशील का?

चंद्रासोबत चांदणी सारखी,
माझ्या सोबत राहशील का?
जन्मभर सोबत राहण्याचं,
वचन मला देशील का?

स्वप्नांतलं जग सोडून,
सत्त्यात कधी येशील का?
विश्वास कुणाचा बसत नाही,
सर्व जगाला तु सांगशील का?

र. सु. पाटील____🖌
मो. ९६५७००२२०९