या आधुनिकतेत सृष्टीचा, मी अंत पाहत आहे।

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, June 28, 2020, 12:24:13 AM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

या आधुनिकतेत सृष्टीचा,
मी अंत पाहत आहे।

शास्त्र आले, विकास झाला।
वस्त्र आले, झकास झाला,
हव्यासापोटी गरजांच्या,
गाव मात्र भकास झाला।

शहरात गर्दी मावली नाही,
माणुसकीची सावली नाही।
चष्म्यात उजेड, कानात गाणे
डोळ्यात चमक, दावलीच नाही।

शस्त्र आले, विनाश झाला,
अस्त्र आले, विनाश झाला।
पठारावरून रक्ताची,
नदी संथ वाहत आहे,
या आधुनिकतेत सृष्टीचा,
मी अंत पाहत आहे।

Narayan Mahale...