ती टाळतं गेली

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 28, 2020, 10:48:42 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.ती टाळतं गेली*
ती पाऊस होतं गेली
मी थेंब होतं गेलो
ती मरण होतं गेली
मी सरण होतं गेलो

ती टाळतं गेली
मी भाळतं गेलो
ती दुःखाना सोडतं गेली
मी दुःखाना कवटाळतं गेलो

ती दुर्लक्ष करतं गेली
मी आतल्या आत झुरतं गेलो
ती गळ्याचा फास होतं गेली
मी मात्र तडफडून मरतं गेलो

ती कवितेचा शब्द होतं गेली
मी त्यांच्या ओळी जोडतं गेलो
ती विरह गीत होतं गेली
मी त्यात वाहतं गेलो

ती स्वप्नांच्या दुनियेत गेली
मी मात्र तिचे स्वप्न पुर्ण करतं गेलो
ती आनंदानं बागडतं गेली
मी त्यात पायाखाली चिरडंतं गेलो

कविराज.अमोल
मो.९६३७०४०९००.
अहमदनगर