जीवनाचा आरसा.....

Started by Prashant Jain, June 29, 2020, 05:48:49 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

   जीवनाचा आरसा.....

आरशावर असते मळभ
त्यामुळे होत नाही वास्तवाची जाण......
स्वच्छ करून पाहता आरसा
स्वतःचे रूप त्यात दिसते छान.....

आयुष्यही आपल असंच असत
निराशावादी विचारांनी ग्रासलेल.....
सर्वांसोबत असून देखील
एकटेपणात दुःख शोधत बसलेल.....

सुखाच्या सागराजवळ उभं राहून
दिसत नाही आपल्याला सुखाचा किनारा......
स्वप्नांच्या मागे पळता पळता
हरवून जातो जीवनाचा आनंद सारा......

देवानं दिलेलं आयुष्य संपत क्षणांत
पूर्णं करता करता अपेक्षा अन जबाबदारी.....
सुख, समाधान,  शांतीच महत्व कळत तेव्हा
मरण येऊन वाट पाहत असत दारीं.....

नशिबाला दोष देत रडत बसण्यापेक्षा
वास्तव परिस्थितीचां करावा स्वीकार...... .
निराशावादाला देऊन तिलांजली
खंबीर मनाने आयुष्याला द्यावा आकार......

निराशेचे मळभ दूर करून
आयुष्याच्या आरशात शोधावं
सुख आणि समाधान.......
कशाचीही अपेक्षा न करता
सर्वांना द्यावं प्रेमाचं भरभरून दान......

-प्रशांत प्रकाश घोडके
शेवगांव,  अहमदनगर
M- 9321931008





Shubhangi Gaikwad

कविता खूपच सुंदर आहे

Prashant Jain

प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद......