अस्तित्व

Started by kavitabodas, March 03, 2010, 02:12:57 PM

Previous topic - Next topic

kavitabodas



जेव्हा भेट होते चांदण्या रात्री दोन तारकांची
प्रीती तिथेच स्मरते त्या दोन पाखरांची
उष:काल होता साजण दृष्टी आड होई
पुन्हा पुन्हा आठवांनी जीव कासावीस होई
दोन नयनात साठवले रूप त्याचे
दोन बाहुत विसावले स्वप्न माझे
लज्जा कशी येते गाली अवचित न कळे
माझीच मी हसत राही भान विसरून सगळे
तुझे अस्तित्वच असते सगळीकडे
कुठूनही चाहूल लागते न कळे
गुंग तुझ्या विचारांनी मन असते हळवे

कविता बोडस

gaurig



nirmala.


santoshi.world

छान आहे कविता ...  फक्त चौथ्या ओळीत "आठवांनी" च्या ऐवजी "आठवणींनी" हा शब्द हवा होता ...  :)