सुनी सुनी झाली पंढरी

Started by Shilpa Mohite, July 01, 2020, 01:52:31 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १४ वे
          सुनी सुनी झाली पंढरी

सुनी सुनी झाली पंढरी
आज हुकली पंढरीची वारी

नाही फुलला भक्तीचा मळा
अवघा वारकरी हळहळला

विठू माझा लेकुरवाळा
लेकरांविनाच झाला सोहळा

मुका झाला विठू नामाचा गजर
कसा झाला हा कोरोनाचा कहर

देवा हात जोडतो घरच्याघरी
दूर कर लवकर ही महामारी

तुझ्या दर्शनाची लागली आस
जीव झाला माझा कासाविस

चुकली जरी आषाढीची वारी
तरी कार्तिकीला येईन तुझ्या दारी
           
          - शिल्पा मोहिते