पाऊस कधीच येऊन गेलाय

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 02, 2020, 06:42:14 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पाऊस कधीच येऊन गेलाय*

पाऊस कधीच येऊन गेलाय
काळजावरच्या ओसाड जमिनीवर
आता फक्त आतुरता असते
त्यावर असणारे खळगे भरण्याची
अन उरलं सुरलं सांत्वन करण्याची
त्यानं केलेल्या मस्करीला उधाण येणार होतं
खळगं भरतांना ती येणं नाममात्र होणार होतं

असाच पाऊस काळजा पलीकडे झाला
हुंदक्यांचा सामना करता करता
त्या आसवांच्या नदीला ही पूर आला
नदी तुडुंब भरून वाहू लागली
विरहाचे गीत गाऊ लागली
नदीच्या पुरात काळीज हेलकावे घेत होत
जीवाच्या अकांतात आतल्या आत झुरत होतं

कसा बसा पूर ओसरायला सुरवात व्हायची
तिच्या चेहऱ्याची चित्रे दाही दिशा कोरायची
नजर जिथं पर्यंत जातं होती
तिथं पर्यंत तिला शोधू लागली
सारी रात्र तिच्या मिलनासाठी झुरु लागली
जेव्हा वाऱ्याची झुळूक स्पर्श करून गेली
तेव्हा मी उगाच छेडण्याचा प्रयत्न केला
अन पुन्हा एक नव्याने स्वप्न भंग झाला

कधी शेजारी बसून कधी गाली हसून
कधी ओठांना स्पर्शून ती कळतं होती
ती अशीचं छळतं होती
असाचं माझ्या प्रेमाचा स्वप्नं खेळ रंगायचा
रानातील पायवाटा तुडवतं मागोवा घ्यायचा
काळजातलं आभाळ भरून यायचं
पुन्हा पावसाचं रडू सुरू व्हायचं
त्याचं पावसानं माझं दुःख झाकलं होतं
तिच्या आठवणींना धुवून टाकलं होतं
आता फक्त मी असतो
माझी लेखणी,लिहलेल्या काही कविता
बाकी कोण नाही ........

✍🏻(कविराज.अमोल)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर