विठोबा माझा सावळा

Started by Shubhangi Gaikwad, July 02, 2020, 11:55:16 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

 विठोबा माझा सावळा

कर कटावरी ठेऊनी युगेन युगे विटेवरी उभा
वैकुंठाचा तू राजा, तू विठोबा माझा सावळा

अज्ञानी आम्ही, जातो शोधाया तुज मंदिरी
विठ्ठल नामाचा घोष करत पायी करतो वारी
असे सदा आमुच्याच अंतरी, देव माझा भोळा
वैकुंठाचा तू राजा, तू विठोबा माझा सावळा

व्यापलास अणूरेणूत सार्या, त्रैलोक्याचा तू स्वामी
भक्तांच्या हाकेला धावशी,तू सकलांचा अंतरयामी
दर्शनाने गळूनी जाती दुःख ,देव तू माझा आगळा
वैकुंठाचा तू राजा, तू विठोबा माझा सावळा

तुझ्या दारी नसे भेदाभेद,असो रंक वा असो राव
माऊलीची मिळे माया,ज्याच्या अंतरंगात भक्तीभाव
दंग झाला विठ्ठल नामात, घालूनी तुळशीमाळ गळा
वैकुंठाचा तू राजा, तू विठोबा माझा सावळा

धर्म रक्षणासाठी येऊनी भूलोकी, तू अवतार धारीशी
देण्यास शक्ती अर्जुनाला,कुरूक्षेत्री विराट रूप दाविशी
ह्या कलियुगाचे सतयुग करण्या, कर पुन्हा एक सोहळा
वैकुंठाचा तू राजा, तू विठोबा माझा सावळा


शुभांगी सुभाष गायकवाड
shubhgaik@gmail.com