प्रेम हे असच असत

Started by Akshay khandare, July 03, 2020, 11:20:35 PM

Previous topic - Next topic

Akshay khandare

प्रेम हे असच असत..........       
करताना ते कळत नसत आणी केल्यावर ते उमगद नसत.............   
उमगल तरी ते समजत नसत........   
पन आपल वेड मन आपलच एकत नसत .... 
ति फक्त त्या दोन जीवांनाच माहित असत. लोक काय म्हणतात काय असत प्रेमात..... पण मि म्हणतो करून बघा एकदा काय नसत प्रेमात.......   
प्रेम हे सांगून होत नसत. मित्रांनो ते झाल्यावरच कळत असत......     
दोन जीवांना जोड़नारा तो एक नाजुक धागा असतो......
दोन हॄदयांची स्पंदने एकमेकांना एकवनारा एक भाव असतो
प्रेमाची परिभाषा खुप वेगळी असते....   दोन शब्दात ति कधीच समजत नसते.....    म्हणूनच प्रेम हे असच असत प्रेम हे असच असत...
पन ते खुप खुप  सुंदर असत........





            अक्षय खंडारे

AVINASH BALU SOMVANSHI

श्वासात अडकावं कसं
श्वास मोकळा असतांना
आरसे खुणावतं असतात
नेहमी तू समोर नसतांना

डायऱ्या कित्येक भरल्या
शब्द वेचून वेचून लिहतांना
सुगंध दरवळत असेल ही
शब्द ओठांवर माळतांना

प्रश्न पडायचा आपली गट्टी
माझ्या कविता जुळवतील
तुझ्या माझ्या आशा दुराव्यात
पुन्हा नव्यानं भेटी घडवतील

असं डोळ्यात साचलेलं दुःख
तुझ्या ओढीनं संपलं नव्हतं
तू दूर का झालीस हा एक प्रश्न
अन त्याचं उत्तर मिळालं नव्हतं

या क्षणिक गोष्टी असतात म्हणून
प्रेमाला उपमा देणं टाळलं जातं
काळजातलं एक पान कोरं ठेऊन
मग उभं आयुष्य मौन पाळलं जातं