मी असाच आहे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 06, 2020, 06:15:54 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.मी असाच आहे*

मी असाच आहे पहिल्या पासून

कोणाला कळतो तर
कोणाला टाळतो
माझ्या कवितेचा एक एक शब्द
कोणाला जाळतो

मी असाच आहे पहिल्या पासून

निशब्द हवा
विरहाची दवा
कोणाच्या प्रेमातला
नकळत असणारा दुवा

मी असाच आहे पहिल्या पासून

कोणाला ओळखतो
कोणाला टाळतो
ज्यांनी धिक्कारलं
त्यांना शब्दात माळतो

मी असाच आहे पहिल्या पासून

ज्यांनी काळीज चोरले
त्यांचा सत्कार होतो
ज्यांनी आसवे भरले
त्यांचा बहिष्कार होतो

मी असाच आहे पहिल्या पासून

गोड बोणाऱ्यांची वाचा होतो
त्यांच्या प्रत्येक ओळीत माळत जातो
रंग मंच आयुष्याचे सजवतांना
प्रत्येक भिकेला साळतं जातो

मी असाच आहे पहिल्या पासून

कोणाचा त्याग होतो
कोणाचा राग होतो
कधी प्रेमळ होतो
तर कधी जगण्याचा भाग होतो

✍🏻(कविराज.अमोल )
मो.९६३७०४०९००.अहमदनगर