विचारून बघतो...!!!

Started by omi2208, July 07, 2020, 07:49:10 AM

Previous topic - Next topic

omi2208

सकाळ दुपार मी तुझ्याच कल्पनेत हरवून जायचो....!!
संध्यकाळी मात्र कट्ट्यावर तुझी वाट पाहायचो..!!
कधी दिसायचीस, कधी नाही दिसायचीस....!!
दिसलीस कधी तर मनात खुश व्हायचो,
पण दिसली नाहीस तर लहान मुलं सारखा निराशही व्हायचो...!!!!!
रोज विचार करायचो कि आज बोलावे तुझ्याशी,
पण रागावशील, चीडशील तू अशी भीती होती ऊराशी....!!!
मित्रां मध्ये हरवून जाणारा मी,
कधी तुझ्यात हरवून गेलो माझे मला कळलेच नाही...!!!
आहे मनात आपुलकी तुझ्या बद्दल, वाटते करावी मैत्री प्रेम आणि बरच काही....!!
आज हिम्मत करेनच म्हणतो, उराशी असलेली भीती बाजूला सुरूच म्हणतो,
माहिती नाही तुझा उत्तर काय असेल तरी हि थोडा दिलासा मनाला देऊन बघतो....!! -Omi2208 ;)