कवितेचा प्रवास

Started by स्वप्निल भाऊसाहेब पटारे, July 07, 2020, 09:32:39 PM

Previous topic - Next topic
शांत एकाकी बसलो होतो,
वही अन् पेन घेवून,
वर्णमालेची झुळूक मनी दाटली ,
अन् अचानक गेलो मी वाहुन ||१||

हळूहळू यमक शब्दांशी
सांगड अशी पडली,
मनात माझ्या काव्यांची
गर्दी बघा झाली ||२||

कोऱ्या अश्या कागदावरती
अक्षरे मी कोरली
आणि काय सांगू ?
त्याची 'कविता 'झाली ||३||

                ~ स्वप्निल भाऊसाहेब पटारे