बाप्पा माझा आला रे!

Started by sachinikam, July 08, 2020, 08:58:22 AM

Previous topic - Next topic

sachinikam

बाप्पा माझा आला रे!

(Chorus – गजानना, गजानना, मंगलमुर्ती मोरया (५ वेळा) )

श्री गणेशा नमन करुया, आरंभी शुभ कार्याच्या
(Chorus - मोरया मोरया)
दे सद्बुद्धि, रिद्धी सिद्धी, सुरभी शुभ लाभाच्या.
श्री गणेशा नमन करुया, आरंभी शुभ कार्याच्या
दे सद्बुद्धि, रिद्धी सिद्धी, सुरभी शुभ लाभाच्या.
सजली आरास, मखर लखलखले
दिव्यांच्या रोषणाईने, मंडप उजळले
बाप्पा माझा आला रे, सुखकर्ता आला रे
बाप्पा माझा आला रे, दु:खहर्ता आला रे || 1 || (३ वेळा)

(Chorus –
है मोरया मोरया मोरया रे बाप्पा, मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया रे बाप्पा, मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया रे बाप्पा, गणपती  बाप्पा मोरया हा)

रमत गमत हसत खेळत,
गणपती बाप्पा आला,
माझा मंगलमूर्ती आला.
माझा गणपती बाप्पा आला.
हे...वाजत गाजत, नाचत गात, गणराज आला
गणांची वरात, रंगली जोरात, मूषकस्वार आला
ढोल वाजले, ताशे वाजले
लेझीमाच्या तालावर, सारे नाचले
गुलाल खोबरे, फुले बताशे
जल्लोष नादात, सारे वाहिले...
बाप्पा माझा आला रे, सुखकर्ता आला रे
बाप्पा माझा आला रे, दु:खहर्ता आला रे || 2 || (३ वेळा)

(Chorus - गणपती बाप्पा मोरया!)
गजानना, गजानना, मंगलमुर्ती मोरया
गजानना, गजानना, मंगलमुर्ती मोरया

(Chorus - वन टू थ्री फोर)
गणेशाचा महिमा थोर.
(Chorus - फ़ाइव सिक्स सेवन एट)
गजाननाची झाली भेट.

गणेशाचा महिमा थोर,
गजाननाची झाली भेट.

बाप्पा माझा आला रे, सुखकर्ता आला रे.
बाप्पा माझा आला रे, दु:खहर्ता आला रे. (३ वेळा)

(गीतकार - सचिन कृष्णा निकम. ९८९००१६८२५. sachinikam@gmail.com)

Listen to this Ganapati Song on YouTube Channel Skrinz Studios Music.