आयुष्य हे एकदाच आहे म्हणून, मन भरून जगायचं!

Started by स्वप्निल भाऊसाहेब पटारे, July 11, 2020, 10:42:11 AM

Previous topic - Next topic
सुख दुःख तर सर्वांनाच आहे
मग आपण का क्लेश करत बसायचं?
आयुष्य हे एकदाच आहे
म्हणून, मन भरून जगायचं      ||१||

लोकांचं काय लोक तर बोलतातच
म्हणून, आपण का कुढत बसायचं?
आयुष्य हे एकदाच आहे
म्हणून, मन भरून जगायचं     ||२||

आपल्याला एकदिवस मरायचच आहे
मग का त्यादिवसाची वाट पहात रहायचा,
आयुष्य हे एकदाच आहे
म्हणून, मन भरून जगायचं    ||३||

आयुष्य हे एकदाच आहे
ते अस जगता आल पाहिजे,
जेव्हा शेवटी यम न्यायला येईल
त्यानं सुद्धा सलाम ठोकला पाहिजे   ||४||
         
         स्वप्निल भाऊसाहेब पटारे