रात्र साऱ्या जागतांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 12, 2020, 07:03:42 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.रात्र साऱ्या जागतांना*

असंच होत प्रेम माझं
कधी रडत कढत जगायचं
तर कधी आडोसा धरून
तिच्या आठवणीत रमायचं

तेव्हा स्वप्नांना माझ्या
रोज अनेक तडे जायचे
त्यांचा ही प्रश्न असायचा
नेमकं कोणाकडे जायचे

आभाळाला फाटा देऊन
पाऊस सारखा पडायचा
दुःखाला सोबत घेऊन
पाऊस सारखा रडायचा

मन भर पावसात चिंब होऊन
झाडाखाली उभं रहायचं
तिच्याशी केलेल्या गुज गोष्टी
घेऊन मन एकटच बडबडायचं

वाटू लागलं जगणं आता
राख चाळून घेतल्यासारखं
प्रेमाच्या पंगतीत बसल्यावर
दुःखाना माळून घेतल्यासारखं

मला पाहून पंगती उठल्या होत्या
सुखाच्या असून त्याही रुसल्या होत्या
तिनं काळजाला चटके दिले तेव्हा
रात्र साऱ्या जागतांना फसल्या होत्या

✍🏻(कविराज.अमोल)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर