पाऊस

Started by रवि पाटील, July 12, 2020, 06:35:41 PM

Previous topic - Next topic

रवि पाटील

॥ पाऊस ॥

तु येणार असलास की
मन श्रुंगार लेउन सजतं.
तु येणार त्या वाटेवर
टक लावून बसतं.

तु येणार असलास की
ढगांची धावाधाव बघत असतं.
ढगांच्या अफरातफरीतून मात्र
विजांचा लपंडाव शोधीत बसतं.

तु येणार असलास की
मनात वाऱ्याचं थैमान असतं.
दारं खिडक्यांना खडखडाडत
आसमंतात उचलून घोंगावत असतं.

तु येणार असलास की
शब्दांना ओळीत माळायचं असतं.
शब्दांच्या चिखलातून चालतांना
मनसोक्त भिजून घ्यायचं असतं.

र. सु. पाटील___✍🏻
मो. ९६५७००२२०९