विसावा …………….

Started by SHASHIKANT SHANDILE, July 14, 2020, 05:04:56 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

शब्द कोंडले हृदयातच मी
भावनेचा गळा दाबला
डोक्यांमधले वैचारिक किडे
सर्वांना मी विष पाजला

उपेक्षा व्हावी पुढे जाउनी
अपेक्षा असल्या ठार मारल्या
आपुलकीचा ठाव सांगती
पुस्तकही त्या पार जाळल्या

इकडे तिकडे मृत पडलेले
स्वप्नांना माती पुरवून आलो
फसव्या पर्यायी वचनांना
पद्धतशीर मी बडवून आलो

विश्वासाची दोर करपली
माणुसकीचा भ्रमित दिखावा
दार मनाचे बंद करूनी
एकांती घेतो गोड विसावा

एकांती घेतो गोड विसावा
*****
शशिकांत शांडिले (एकांत), नागपूर
भ्र.9975995450
Its Just My Word's

शब्द माझे!

Charansing Bayas

* जगा स्वच्छंदी जीवन*

लोकांचं काय लोक तर बोलतच आसतात
म्हणून का आपण  कुढत बसायचं..?
आयुष्यातील दुःख संपणार नाही
कुठवर कोंडमारा करून जगायचं...   

सुख दुःख तर सर्वांनाच आहे
मग आपण का क्लेश करत बसायचं..?
आयुष्य हे असच आहे
कुठवर मन मारून जगायचं...     

मरण हे अटळ आहे
एकदिवस सगळ्यांना मरायच...,
का त्या दिवसाची वाट पहात रहायचं..?,
गेलेला क्षण पुन्हा नाही तो एकदाच आहे
मग का...? मन मारून जगायचं...
   
काही लोकांना सवयच असते
का..? त्याच एवढं मनावर घ्यायचं,
आपण आपल स्वच्छंदी बागडायच
त्याचा नजरेत खटकत मन भरून जगायचं...

आयुष्य हे एकदाच आहे
ते तर भरभरून जगायचं,
शेवटी कितीही केली हाव हाव
सार येथेच सोडून जायचं...

म्हणून म्हणतो मित्रांनो
नाही आता असे खागायच,
आयुष्य हे एकदाच आहे
मनासारखे मनभरून जगायचं...!!!
          - ...✍चरणसिंह बायस

Charansing Bayas

* जगा स्वच्छंदी जीवन*

लोकांचं काय लोक तर बोलतच आसतात
म्हणून का आपण  कुढत बसायचं..?
आयुष्यातील दुःख संपणार नाही
कुठवर कोंडमारा करून जगायचं...   

सुख दुःख तर सर्वांनाच आहे
मग आपण का क्लेश करत बसायचं..?
आयुष्य हे असच आहे
कुठवर मन मारून जगायचं...     

मरण हे अटळ आहे
एकदिवस सगळ्यांना मरायच...,
का त्या दिवसाची वाट पहात रहायचं..?,
गेलेला क्षण पुन्हा नाही तो एकदाच आहे
मग का...? मन मारून जगायचं...
   
काही लोकांना सवयच असते
का..? त्याच एवढं मनावर घ्यायचं,
आपण आपल स्वच्छंदी बागडायच
त्याचा नजरेत खटकत मन भरून जगायचं...

आयुष्य हे एकदाच आहे
ते तर भरभरून जगायचं,
शेवटी कितीही केली हाव हाव
सार येथेच सोडून जायचं...

म्हणून म्हणतो मित्रांनो
नाही आता असे खागायच,
आयुष्य हे एकदाच आहे
मनासारखे मनभरून जगायचं...!!!
          - ...✍चरणसिंह बायस
                   अंबड जि.जालना
                   दि.05/09/2020
                   मो.9420390403