सांग तू आता

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 15, 2020, 06:29:39 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सांग तू आता*

अंतःकरणात कसे हुंदके साठवू सांग तू आता
दुःख उरलेले कोणास दाखवू सांग तू आता

असेल पाषाणावर नाव कोरले नजरचुकीने
त्याची सावली कशी पांगवू सांग तू आता

कोरे कागद माझ्या उशाला ओले चिंब होतात
त्यांचे अस्तित्व जगा कसे पटवू सांग तू आता

सुखाचे बिछाने असावेत नेहमी वाटत असते
काटेरी बिछान्याला कसे सजवू सांग तू आता

वाईट वाटते कधी कधी तुझं वागणं पाहून
असा किती दिवस जीव झिजवू सांग तू आता

असे किती दिवस जगावे म्हणतो एकट्याने
कोणत्या फांदीवर हा देह टांगवू सांग तू आता

कधी कळले नाही वादळ येईल प्रेम केल्यावर
तुझ्यासाठी कधी डोळे मिटवू सांग तू आता

✍🏻(कविराज.अमोल शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर