तुझ्या गुलाबी ओठांचा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 16, 2020, 08:10:23 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझ्या गुलाबी ओठांचा*

तुझ्या गुलाबी ओठांचा
नजराणा चुकून आला
नकळत आसवांनी तो
असा का झाकून गेला

केसांवर हात फिरवंतांना
त्यात गजरा माळून गेला
तुझ्या नाकावर घामाचा
एक थेंब दिवाना टांगून मेला

किती मागे पळू आता मी
प्रेम वेडे सोबतीला घेऊन
हाक असते सोबत नेहमी
नकळत जाते दगा देऊन

असाच झाला हा भ्रमर वेडा
तू दिलेल्या गुलाबावर भाळला
जवळीक असता आपली तरी
भेटीचा वेळ त्याने हा टाळला

असे अजून व्हावे त्यानं वेडे
तुझ्या मोहक अदाकारीतं
त्याला कळलेच नाही कधी
खेळ खेळले होते सारे चतुराईतं

बांदावर वसवले मी सुगंधित
फुलांच्या वस्तीचे गाव नवे
रोज तुला देतांना जळून गेले
त्यांच्या काळजाचे घाव नवे

✍🏻(कविराज.अमोल शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर