मनाच्या या हिंदोळ्यावर

Started by Shilpa Mohite, July 17, 2020, 04:51:12 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १६ वे
          मनाच्या या हिंदोळ्यावर

ऐकत असतं कुणीतरी
म्हणून गावसं वाटतं
झाडं,वेली, पानांवर
बागडावसं वाटतं

तहानलेलं असतं कुणीतरी
म्हणून बरसावं वाटतं
हिरव्यागार गालिच्यावर
लोळावसं वाटतं

सुगंध हवं असतं कुणालातरी
म्हणून फुलावसं वाटतं
फुलपाखरांच्या संगतीत
डोलावसं वाटतं

मनाच्या या हिंदोळ्यावर
अनेक रुपांना झुलावसं वाटतं
परि मिळे एकच मूर्त रूप
मनाला हे सांगावसं वाटतं
       
          -शिल्पा मोहिते