दुःखाचे सांगणे आता

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 19, 2020, 11:13:08 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक. दुःखाचे सांगणे आता*

नको कोणाला दुःखाचे सांगणे आता
सुख ही म्हणते नको येथे नांदणे आता

वाटते रातीला ही वाईट स्वप्न पडले असेल
तेव्हा दिवसाही पडतात येथे चांदणे आता

खूप दिवस झाले आहे मंदिरे शांत होऊन
सांग देवा कोणास मागू माझे मागणे आता

सारे रस्ते विरान झाले घर असे घर ना राहिले
असेच आयुष्य शेवटी एकट्याने काढणे आता

वाटतं नाही स्मशानात चिरशांती लाभेल ही
भेटते क्षणा क्षणाला तिरस्कारित वागणे आता

✍🏻(कविराज.अमोल शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर