विरांचे बलिदान

Started by Prashant Jain, July 21, 2020, 05:21:02 AM

Previous topic - Next topic

Prashant Jain

   वीरांचे बलिदान

स्वातंत्रदिनी आठवूया
विरांचे बलिदान.....
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी दिले स्वतःचे प्रांण....

स्वातंत्र्यासाठी जे लढले
करून संसाराची होळी.....
हसत हसत मरण स्वीकारले
छातीवर घेऊन गोळी......

पारतंत्र्यात होती भारतमाता
होता जुलूम अन अत्याचार.....
स्वातंत्र्यासाठी जे लढले
हाती घेऊन क्रांतीची तलवार......

असहकार,  सत्याग्रह, खादी
होता बापूजींचा नारा.....
हादरून गेली ब्रिटिशसत्ता
पेटून उठला देश सारा.....

शरणं आली ब्रिटिशसत्ता
झाली ऑगस्ट क्रांती.....
स्वतंत्र झाली भारतमाता
नांदवण्या सुख शांती.....

डौलानें फडकला तिरंगा
मिळालें स्वातंत्र्याचे वरदान....
स्वातंत्रदिनी आठवूया
विरांचे बलिदान......
                                                   
-प्रशांत प्रकाश घोडके,
शेवगांव, अहमदनगर, 
M- 9321931008