पाखरू ??

Started by Ashok_rokade24, July 21, 2020, 01:37:55 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

पंखात सारूनी चोच ,
निजले कसे पांखरू ,
पिंजरी जगते आता   ,
आई विना हे लेकरू ॥

शिळ किती मंजुळ ही ,
आनंदी भासते जरी ,
डोळ्यात दाटती अश्रू  ,
असाह्य भासे पांखरू॥   

नभी नित पाहतांना ,
कारूण्य नयनी दाटे ,
पंखी न राहीले बळ ,
जाईल कुठे पांखरू ॥

आनंदे विहरती पक्षी,
सुखे विसावती वृक्षी ,
पिंजरी कैद हे झाले ,
जखमी एक पांखरू॥

माणसातच रहाणे,
माणसाहाती जगणे ,
घेऊन पंख जखमी ,
जाणार कसे पांखरू ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई.