जीवनाला संघर्ष हेच दुसरे नाव

Started by Shilpa Mohite, July 22, 2020, 08:24:30 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १७ वे

        जीवनाला संघर्ष हेच दुसरे नाव

जीवनाला संघर्ष हेच दुसरे नाव
कधी अस्मानी, कधी सुलतानी
घालीत असतात घाव
भोग म्हणूनी गतजन्माचे
भोगायचे दिनरात
दिवस सरती, सरती वर्ष
करण्या संकटावरती मात
तरीही विश्वासाचा एक किरण
घेतो सत्याकडे धाव

करुनी मोकळे, तरीही सोवळे
मिरविती उजळ माथी
तरीही येथे पुण्यशिलालाच
संशयी नजरा खाती
काही कळेना कसे असे हे
नियतीचे घूमजाव

हे परमेशा! हे जगदिशा!
तुझे पाईक अजून ही असती पुष्कळ
श्रद्धा त्यांची कधी न ठरो निष्फळ
अस्तित्व तुझे दाखव आता
उधळून टाक नियतीचा क्रूर डाव
       
              - शिल्पा मोहिते