अरे हे कोरोना तुझ्यामुळे आमचं लग्न मात्र राहिलं

Started by Dnyaneshwar Musale, July 23, 2020, 07:02:39 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

कोरोना
तुझ्यामुळे lockdown झालं
आमचं पोरांचं लग्न मात्र राहून गेलं

ही नाहीतर ती अशा पाहिल्या ही बऱ्या,
कांद्या पोह्यांवरचं
किती दिस घालाव्या आमच्या सारख्यानं फेऱ्या,
कधी जमलं तर कधी मोडलं
पण कोरोनामुळं  आमचं लगीन
लांबणीवर पडलं.

हिचा बायोडाटा तिचा बायोडाटा
यातच संपल्या बऱ्याच शा नोटा,
पण  कोरोना तु आम्हाला
घरातच बसवलं
पोरींन पेक्षाही तूच जास्त फसवलं,

कुणी म्हणत आता
मुहूर्त नाही यंदा,
पण खरं सांगु कोरोना
तुझ्यामुळेच
आमचा झालाय वांदा.

आता तरी कोरोना
जा एकदाच तु निघुन,
यंदा नाही झालं
तरी
पुढच्या वर्षी आम्ही आमचं
घेऊ बघुन.