ज्वलंत आत्मविश्वास

Started by Prashant Jain, July 23, 2020, 07:17:14 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

 "ज्वलंत आत्मविश्वास"

उदयॊगधंदे बंद पडले
लाखों लोक झालें बेकार....
परप्रांतीयांचे लोंढे निघाले गावाकडे
डोक्यावर घेऊन उध्वस्त संसार.....

हाथाला काम होते
खिशात खेळत होता पैसा...
कोरोनाची सुनामी आली
आघात झाला हा कैसा.....

पोट भरण्याचे गेले साधन
जीव वाचवायचा सुरु झाला खेळ....
चोवीस तास राबणाऱ्या हाथाना
रिकामे राहण्याची आली वेळ....

लाखोंचे पोट भरणारे शहर
लॉकडाऊनमुळे झालें शांत....
भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांना
पडली वर्तमानाची भ्रांत.....

कृपा कर भगवंता
लवकर सापडुदे कोरोनावर लस....
सुखाने नांदेल आखिल विश्व
याचा मनी ज्वलंत आत्मविश्वास.....

-प्रशांत प्रकाश घोडके,
शेवगांव, अहमदनगर
M - 9321931008