लाल परी

Started by Dnyaneshwar Musale, July 29, 2020, 10:03:43 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

माझ्या गावाक
येते ती  लाल परी,

लई झ्याक नसली
पण आहे खरी,
येळ न चुकवता येते
घेऊन मला घरी
हा तीच ती लालपरी,

ती आली की
गाव सार तिच्याशी बोलतं,
कारण तिलाच काळजी
समद्यांची
कुणाची साळा,
तर कुणाचं बाजार,
कुणाचा आजार,
कुणाचं बाळंतपण तर कधी
सुईन ही तीच व्हते,
गावकीत, भावकीत नाही
समद्यांच्या घरात
ती जाते.
कधी सुनेला सासर
तर कधी,
ताईला माहेर,
गावाची ओळख तीच करून देते येशी बाहेर.

कधी तिनं
हलगर्जीपणा नाही केला,
वरल्या आळीच्या पप्याचा
साखरपुडा तिच्यामुळत झाला,
ऊन ना पाऊस ती
नुसती फिरते,
नाती समजतं नाही पण
तरी
एका धाग्यात सारी जुळवुन धरते.

कधी खड्डे तर
कधी पुर,
सारं काही ती सोसते,
कुणी जवळ येऊ अगर
न येवो
ती मात्र हसताना दिसते,

आता बरचं दिस झालं
ती गावक फिरकलीच नाही,
आज ही तिची वाट पाहात
माणसं स्टँड धरून बसतात,
ती येते म्हणुन तर गावात माणसं दिसतात.

मला ही जायचं घरी,
लवकर सुरू होना  ग तु लालपरी.

ज्ञानेश्वर मुसळे
८७९६४५४१५६