‘मंतर’........ कोरोना स्पेशल

Started by Mayur Mundada, July 29, 2020, 12:27:18 PM

Previous topic - Next topic

Mayur Mundada

घाबरुन कोरोनाला गेलो मी देवापाशी,
म्हंटल, घरात ठेवुन का मारतो उपाशी

म्हणाला देव, अरे सोड कोरोनाचा भेव,
तोंडाला आपल्या सदैव 'मास्क' ठेव

देतो तुला एक मंतर,
माणसात ठेवा सुरक्षित अंतर

कोरोना कोरोना उगाच करु नको राडा,
रोज सकाळी घे तु 'गरम' काढ़ा

साबणाने धुत जा नेहमी हात,
घरातुनच दे 'कोरोना योद्धाला' साथ,

शिशुपालाने केले पुष्कळ पाप,
केले त्याचे ही 'शंभर' गुन्हे माफ़

कोरोना तर आहे एक छोटासा बाळ,
माजु दे त्याला थोडा काळ

आले किती ही द्रुष्ट रावण,
शेवटी झाले त्यांचे इथेच दहन

बस मानवा, तु सोडु नको धर्माला,
याला मारण्याचे काम सोपविले मी भारताला


©- मयुर मुरलीधर मुंदडा
मो ९४०४५४४४७५


Send Reviews | Like | Comment | Share
MMM