*** लपंडाव ऊन-पावसाचा ***

Started by धनराज होवाळ, July 31, 2020, 11:57:04 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🌦️ लपंडाव ऊन-पावसाचा 🌦️

लपंडाव ऊन-पावसाचा,
जणू सुख-दुःखांचा खेळ..
हसण्याला अन् रडण्याला,
इथे नाही कसलाच मेळ..!!

शेतकऱ्यांना ही आवडतो,
लपंडाव ऊन-पावसाचा..
ऊन खत पाऊस पाणी,
असतो नित्यक्रम दिवसाचा..!!

यांच्याशिवाय कसं माझं,
म्हणे शेतकरी हा रे माझा..
लपंडाव ऊन-पावसाचा,
काळ्या मातीचा हा रे राजा..!!

शेतकऱ्यांना सुखावणारा,
हा पाऊस असतो नवसाचा..
म्हणून आवडतो मला ही,
लपंडाव ऊन-पावसाचा..!!

लपंडाव ऊन-पावसाचा,
हा खेळ आहे मातृत्वाचा...
लपंडाव ऊन-पावसाचा,
माझ्या तुझ्या कर्तृत्वाचा...!!!
-
🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ )
कुंडल, जि. सांगली.
मो. ९९७०६७९९४९.