तू त्या प्रश्नाचं उत्तर दे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 02, 2020, 07:52:45 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तू त्या प्रश्नाचं उत्तर दे...?*

तुझं नेहमी माझ्याकडं
पाहून हसणं हे तुझं प्रेम होतं
तुझं रस्त्यातून चालत असतांना
मागेवळून पाहणं हे तुझं प्रेम होतं

तुला माझ्याशी बोलल नाही की
तुला न करमन हे तुझ प्रेम होतं
माझ्या हतावर पेनाने तुझं
नाव काढणं हे तुझ प्रेम होतं

मला पाहून तू स्वप्नांच्या
दुनियेत हरवून जायचीस हे तुझं प्रेम होतं
मेहंदीच्या नक्षीत माझं चोरून
नाव काढायचीस हे तुझं प्रेम होतं

तुझं पहिले माझ्या आवडीचा
ड्रेस घालणं हे तुझं प्रेम होतं
माझ्या प्रेम पत्रांनी तुझ्या सॅकचा
एक कप्पा सजवणं हे तुझं प्रेम होतं

माझ्या दारातून सणासुदीला
नटून थटून जाणं हे तुझं प्रेम होतं
मी दिसलो नाही की नाक मुरडून
माझ्यावर रुसणं हे तुझं प्रेम होतं

नजर चुकवून रोज रोज
चोरून भेटणं हे तुझं प्रेम होतं
नेहमी माझ्या दुराव्यात तुझ्या
डोळ्यातून अश्रूं येणं हे तुझं प्रेम होतं


आज ही माझ्यासाठी तुझ्या डोळ्यातून अश्रु येत असतील तर हे देखील तुझ प्रेम आहे..... तर तू ज्यावेळी माझ्या जवळचं कोणी नसताना हात सोडलास हे काय होत ???

या प्रश्नाच उत्तर मी शोधतोय
तू त्या प्रश्नाच उत्तर दे......???
तू त्या प्रश्नाचं उत्तर दे....???

✍🏻(कविराज अमोल शिंदे पाटिल).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर