मैत्री

Started by रवि पाटील, August 02, 2020, 11:05:50 AM

Previous topic - Next topic

रवि पाटील

॥ मैत्री ॥

आजचा दिवस खास
दिलखूलास सतरंगी मैत्रीचा!
होय! मी हि मालकच
ह्या बेशुमार दौलतीचा!!

हातात हात, खांद्याला खांदा
हा खेळ अव्यक्त भावनांचा!
ना नियम, ना अटी, ना शर्ती
हा भाव अरक्त नात्याचा!!

कट्ट्यावरची यारीची मैफिल
फड रंगतो गप्पांचा!
"बस क्या भिडू" म्हणत
मी हि हकदार त्या "दे रे टाळी"चा!!

एक कप चहाच्या झूरक्यासरशी
मनात खुलतात असंख्य वाटा!
निस्वार्थ अन् निरागसतेच्या घोटातून
फुर्रर्रकन उसळे दोस्तीच्या लाटा!!

✍🏻_____र. सु. पाटील

मो. ९६५७००२२०९