नाच रे मयुरा

Started by Shilpa Mohite, August 06, 2020, 06:55:44 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १९ वे
       नाच रे मयुरा

आल्या आल्या जलधारा
धुंद पिऊनीया वारा
अंगणात माझ्या
नाच रे मयुरा

थेंब झाले सारे मोतीं
माझ्या अंगावर खेळती
मन सुखावले किती
तृप्त झाली रे धरा

रान झाले हिरवेगार
आला ऋतूचा बहर
कडे कपारीतून वाहसी
खळाळत तू निर्झरा

ऊन पावसाचा खेळ
आला घेऊन श्रावण
वर इंद्रधनुची कमान
तू फुलव पिसारा
       
             - शिल्पा मोहिते

Atul Kaviraje

Re: नाच रे मयुरा

     शिल्पा मॅडम, हे सारे त्या अमृत धारा बरसविणाऱ्या पावसाचीच किमया आहे, कि ज्यामुळे सर्व मानव जात, सर्व प्राणीमात्र आनंदून जाते, मोहरून जाते.विशेष करून मयूर-मोर, यास इतका हर्ष होतो कि तो आपला हर्ष आपला सुंदर फ़ुलारा पसरवून नाचून दर्शवतो.

     अत्यंत मोहक, प्रेक्षणीय असे ते दृश्य असते जे डोळ्यांचे पारणे फेडते. उद्विग्न मनास मयूर आपल्या आकर्षक नृत्याने, संजीवनी देत जातो.

     असे नृत्य दाखव मयुरा
     बेभान बेधुंद फुलवून पिसारा
     क्षणिक वाहण्याचेहि  थांबून जरा
     मोहक अदा पाहील वारा.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक- रविवार -२३.०५.२०२१