म्हणतो मी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 11, 2020, 06:29:56 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.म्हणतो मी*

अशी असावीच कोणाशी संगत म्हणतो मी
माणुसकीची बसत नाही पंगत म्हणतो मी

जगाला कळले असेल कदाचित वागणे ही
आता येत नाही मैफिलीत रंगत म्हणतो मी

कशाला बढाया मारल्या होत्या पैशावाल्याने
कामी आली का सांग तुझी किंमत म्हणतो मी

अरे वेड्या जातील देहाला आग लावून सारे
असे एक जागी कोण नाही गुंतत म्हणतो मी

अशा वागण्याने रडणार कदाचित आत्मा ही
करावीच कशाला मरण्याची गंमत म्हणतो मी

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर