आठवणी

Started by Yash Mhatre, August 11, 2020, 10:18:29 AM

Previous topic - Next topic

Yash Mhatre

आठवणी सगळ्या लपवून काही ठेवल्या
पण काही आठवणी जणू सोबतच राहील्या
आता आठवणींना तू जणू वाचा अशी फोडली
त्याने तुझ्या विना जणू आयुष्याची घडी मोडली

आता तुझ्या सोबत मलाही राहायचं आहे
थोडे क्षण का होईना आनंदाने रहायचं आहे
जुन्या आठवणींना पुन्हा जगायचं आहे
त्या आठवणींना तसेच जिवंत ठेवायचं आहे

तुझ्या त्या रुपात पुन्हा बहळून जायचं आहे
तुझ्या त्या निळसर डोळ्यांमध्ये मलाही स्वप्ने रंग वायची आहेत
आपल्या त्या स्वप्नांना सोबत सकरायच आहे
अशीच सोबत आयुष्याची नवीन घडी बसवायची आहे
                      .__यश म्हात्रे