काल ती म्हणाली........

Started by Yash Mhatre, August 12, 2020, 11:20:11 AM

Previous topic - Next topic

Yash Mhatre

काल ती म्हणाली ......
कविता तू छान करतो
थोडीशी sad  करतो
पण कविता तू छान करतो

शब्दाला शब्द लावतो
नी भावना त्यात ओतून टाकतो
आठवणींच घर बांधतो
पण कविता तू छान करतो

तुझी प्रत्येक कविता मी माझ्याशीच जोडतो
जणू त्या कवितेत मी मलाच शोधतो
त्या कवितेत मी स्वतः हरवून जातो
पण खरच कविता तू छान करतो
                             :-  यश गणेश म्हात्रे