नकळत

Started by kkomal, August 13, 2020, 03:38:31 PM

Previous topic - Next topic

kkomal

नकळत कधी कुठे कसे पण
हे मन तुझ्यात रुजले होते
दुरावले तरी
शेवटी तुझ्यात गुंतले होते .

सोडवावा तरी सुटेना
इतका गुंता गुंतत गेला
माझा नाही माहित असताना
देखील मनाला तूच भावत गेलास .

दूर हि गेले पण परत
असा काही जवळ आलास
जेवढा जवळचा आधी होतास
त्याचा दुप्पट जवळचा भासू लागलास.

शेवटी भासच ते
कधी तरी मोडणारच
खोट्या स्वप्नांचा महाल
सत्यात थोडीच का टिकणार.

मोडली ती स्वप्ने
जी पाहताना भीती वाटली होती
म्हणूनच शेवट परेंत तुला
ना सांगण्याची इच्छा मनी धरली होती.

मोडू  दे स्वप्न मोडू दे माझ मन
फरक नाही पडत आता माझा दुःखाचा
बस्स तुला सुखी पाहायचंय
एवढीच होती कायम इच्छा.
                       kk.

kkomal


नकळत कधी कुठे कसे पण
हे मन तुझ्यात रुजले होते
दुरावले तरी
शेवटी तुझ्यात गुंतले होते .

सोडवावा तरी सुटेना
इतका गुंता गुंतत गेला
माझा नाही माहित असताना
देखील मनाला तूच भावत गेलास .

दूर हि गेले पण परत
असा काही जवळ आलास
जेवढा जवळचा आधी होतास
त्याचा दुप्पट जवळचा भासू लागलास.

शेवटी भासच ते
कधी तरी मोडणारच
खोट्या स्वप्नांचा महाल
सत्यात थोडीच का टिकणार.

मोडली ती स्वप्ने
जी पाहताना भीती वाटली होती
म्हणूनच शेवट परेंत तुला
ना सांगण्याची इच्छा मनी धरली होती.

मोडू  दे स्वप्न मोडू दे माझ मन
फरक नाही पडत आता माझा दुःखाचा
बस्स तुला सुखी पाहायचंय
एवढीच होती कायम इच्छा.
                       kk.