कशासाठी पोटासाठी

Started by Prashant Jain, August 15, 2020, 06:23:55 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain


"कशासाठी – पोटासाठी"

शेतात राबतोय बळीराजा
कशासाठी पोटासाठी.....
भुकेने व्याकुळ झालेल्या
लेकरांच्या ओठांसाठी......

पाऊस नाही पडला
कोरडे पडले शिवार....
कारभारणीचे दागिने गेले
गहाण पडले घरदार.....

घरात खायला दाणा नाही
कसे करावे लेकरांचे शिक्षण....
दारिद्र्यात चाललंय आयुष्य....
दिसेना कुठे सुखाचे लक्षण.....

लाखांचा पोशिंदा शेतकरी
लोक म्हणतात बळीराजा....
दोन वेळच्या भाकरीची भ्रांत
कशी द्यावी नियतीने सजा.....

कृपा कर भगवंता
दे पावसाचं वरदान....
थांबव शेतकरी आत्महत्या
होउदे बळीराजा धनवान ....

नियतीशी लढतोय बळीराजा
कशासाठी पोटासाठी.....
दुःखातही हसू शोधणाऱ्या
लेकरांच्या ओठांसाठी.....

-प्रशांत प्रकाश घोडके
शेवगांव अहमदनगर
M- 9321931008