कटू पणाचे स्वभाव

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 16, 2020, 06:21:05 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक .कटू पणाचे स्वभाव*

साऱ्यांनी केले असतील ठराव नवे जर
असतील चेहऱ्यावर ही भाव नवे जर

येऊ नका जवळ हात घेऊन दोस्तीचा
हरवण्याचे केले असतील सराव नवे जर

मग आता कोणाची संगत नको मला ही
असतील कटू पणाचे स्वभाव नवे जर

नको असणारे सोडले केव्हाचं घरटे मी
कोणास ठाऊक असले ते गाव नवे जर

देणार दुःख सारे माहीत असते मला
गेलो नसतो माहीत असते साव नवे जर

या आसवांनी कोणाशी भांडावे आता
देऊन जातात अनोळखी घाव नवे जर

आज मीचं माझा खुशाल जगतो आहे
जगणार पुढे ही मिळाले नाव नवे जर

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर